Women Scheme Udyogini Yojana : स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा अनेक महिलांमध्ये असते, मात्र भांडवलाची अडचण अडथळा ठरते. हीच अडचण दूर करण्यासाठी केंद्र आणि विविध राज्य सरकारांनी महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे उद्योगिनी योजना, जी महिलांना कोणत्याही गॅरंटीशिवाय व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देते.
उद्योगिनी योजना म्हणजे काय?
या योजनेची सुरुवात सर्वप्रथम कर्नाटक सरकारने केली होती. कालांतराने अनेक राज्ये आणि केंद्र सरकाराने ती स्वीकारली असून, आज देशभरातील महिलांना तिचा लाभ मिळत आहे. या योजनेत महिलांना १ लाख ते ३ लाख रुपयांपर्यंतचे तारण-मुक्त कर्ज मिळते. म्हणजेच, कर्जासाठी कोणतीही सुरक्षा किंवा हमी द्यावी लागत नाही. या निधीतून महिला ब्युटी पार्लर, शिलाई क्लास, डेअरी, किराणा दुकान किंवा इतर कोणताही छोटा व्यवसाय सुरू करू शकतात.
येथे वाचा – खुशखबर! या ॲपवर नोंदणी करा आणि सोयाबीन, कापूस हमी भावात विका..!
कोण अर्ज करू शकतात?
उद्योगिनी योजनेसाठी काही मूलभूत पात्रता अटी आहेत : (1) अर्जदार महिला १८ ते ५५ वर्षे वयोगटातील असावी, (2) तिच्या नावावर पूर्वी कोणतेही कर्ज थकित नसावे, (3) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १.५ लाख रुपयांपर्यंत असावे, (4) विधवा आणि दिव्यांग महिलांना उत्पन्न मर्यादा लागू नाही—त्या थेट अर्ज करू शकतात
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
(1) आधार कार्ड, (2) पासपोर्ट आकाराचा फोटो, (3) उत्पन्न प्रमाणपत्र, (4) जातीचा दाखला (लागू असल्यास), (5) व्यवसाय योजना, (6) प्रशिक्षण किंवा अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
येथे वाचा – पुन्हा पावसाचे संकट; हरभरा, गहू उत्पादकांना पंजाब डख यांचा महत्त्वाचा सल्ला…
अर्ज कसा करायचा?
अर्ज प्रक्रिया अतिशय सोपी आहे. जवळच्या कोणत्याही राष्ट्रीयकृत किंवा सहकारी बँकेत जाऊन थेट अर्ज करू शकता. किंवा myscheme.gov.in या सरकारी पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज सुद्धा करता येतो. पूर्वी ही योजना केवळ कर्नाटकपुरती मर्यादित होती, पण आता देशभरातील पात्र महिलांना तिचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध आहे.