लाडक्या विद्यार्थ्यांना 2500 रुपये महिना; फक्त हे कागदपत्र द्या आणि थेट खात्यावर पैसे!

School Scheme Maharashtra : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर समोर आली आहे! शिक्षण घेताना होणारा खर्च, प्रवास, स्टेशनरी आणि इतर गरजांमुळे अनेक विद्यार्थ्यांवर ताण येतो. पण आता सरकारच्या नव्या निर्णयामुळे काही विशिष्ट विद्यार्थ्यांना दरमहा २,५०० रुपयांची थेट आर्थिक मदत मिळणार आहे. मात्र, कोणते विद्यार्थी पात्र आहेत? आणि ही रक्कम नेमकी कशी मिळणार…? याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे..

राज्य सरकार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी अनेक योजना सुरू करते. महिलांसाठी ‘लाडकी बहिण’ सारख्या उपक्रमांप्रमाणेच, आता मुलांसाठीही सरकारने एक महत्त्वाची योजना राबवली आहे—ज्यात पात्र विद्यार्थ्यांना दरमहा ₹2,500 ची आर्थिक मदत दिली जाते.

कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार 2500 रुपये महिना?

ही योजना 0 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी लागू असून, त्यांचा शिक्षण, पोषण, आरोग्य आणि दैनंदिन गरजांसाठी ठोस आधार म्हणून ही रक्कम थेट दिली जाते. सरकारचा विश्वास आहे की या मदतीमुळे राज्यातील अनेक बालकांचे भविष्य अधिक सुरक्षित आणि सक्षम होईल. योजनेची खास बाब म्हणजे एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त मुलांनाही या योजनेचा लाभ मिळू शकतो, आणि तोही थेट 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत.

कोरोना काळात अनेक मुलांनी पालक गमावल्याने त्यांचे आयुष्य अचानक अंधारात गेले. अशा अनाथ किंवा असहाय्य मुलांना आधार देण्यासाठीच राज्य सरकारने ही योजना सुरू केली, जेणेकरून त्यांचे संगोपन आणि शिक्षण खंडित होऊ नये.

येथे वाचा – आता घरबसल्या आधार अपडेट करा.. नाव, पत्ता, मोबाइल सगळं एका ॲपमधून बदलता येणार..!

योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत

आधारकार्ड, शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, मृत्यू प्रमाणपत्र (लागू असल्यास), रहिवासी दाखला, बँक पासबुक, रेशन कार्ड, तसेच अंगणवाडी सेविकेसोबत घेतलेला फोटो.

येथे वाचा – आता घरबसल्या आधार अपडेट करा.. नाव, पत्ता, मोबाइल सगळं एका ॲपमधून बदलता येणार..!

Leave a Comment

Join WhatsApp Group