कांद्याला पुन्हा एकदा बाजारात भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मेहनत, खर्च आणि महिनोंमहिने घेतलेल्या कष्टांचं योग्य मूल्य न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहेत. वाहतूक खर्चापासून ते मजुरीपर्यंत सर्व खर्च वाढलेला, पण बाजारात मात्र दर कोसळल्याने शेतकरी अस्वस्थ आहेत. अशा परिस्थितीत एका शेतकऱ्यांने मोठा निर्णय घेतला आहे.
कांद्याच्या दराने तळ गाठल्याने वैजापूर तालुक्यातील रघुनाथपूरवाडीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सतत घसरत असलेल्या बाजारभावांमुळे त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने दोन एकरांवर जोमाने उभं असलेलं निरोगी कांदा पीक अखेर नांगरून टाकण्याचा कठोर निर्णय घेतला.
प्रतिक्विंटल केवळ ५०० रुपये मिळत असल्याने हा निर्णय घेण्याची वेळ शेतकरी शेवंतराव कारभारी पटारे यांच्यावर आली. गट क्रमांक १२१४ मधील दोन एकर क्षेत्रावर त्यांनी मेहनत घेऊन कांदा पिकाची लागवड केली होती. पण बाजारात दर कोसळतच गेल्याने त्यांनी शनिवारी सकाळी सुमारे १० वाजता रोटाव्हेटर चालवत संपूर्ण पीक जमीनदोस्त केले.
कांदा बाजारात नेण्यापूर्वीच वाहतूक आणि मजुरीवर मोठा खर्च होतो, आणि त्यावर बाजारातील दर फक्त प्रतिक्विंटल ५०० रुपये मिळत असल्याने परिस्थिती आणखी कठीण होत आहे. “ज्या पिकाचा खर्चही भरून निघत नाही, तो बाजारात नेण्यात काय अर्थ उरतो?” असा सवाल करत त्यांनी आपल्या मनातील नाराजी व्यक्त केली.
कांद्याला 1 एकरासाठी तब्बल एवढा खर्च
कांद्याचं पीक उभं करण्यासाठी शेतकरी नेमका किती खर्च करतो, हे अनेकांना माहितच नसतं. पण प्रत्यक्षात पाहिलं तर एका एकरासाठी तब्बल ७० हजार ३४० रुपये खर्च होतो — आणि हे आकडे ऐकले की कुणालाही धक्का बसेल!
लागवडीपासून ते काढणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्याला सतत खर्च करावा लागतो. सुरुवातीलाच लागवडीसाठी अंदाजे १२,००० रुपये, त्यानंतर खतांसाठी १०,५४० रुपये, नांगरणी आणि मशागतीसाठी मिळून ४,००० रुपये, तसेच सन्य ओढणे आणि वाफे बांधणे यासाठी जवळपास ४,८०० रुपये इतका खर्च होतो.
यानंतर निंदणी, फवारणी आणि मजुरी यावर मोठं खर्चाचं ओझं येतं — निंदणी ६,०००, फवारणी १२,०००, मजुरी ५,०००. शिवाय बियाण्यासाठी सुमारे ६,००० रुपये आणि रोपे लावण्यासाठी अतिरिक्त १०,००० रुपये खर्च करावा लागतो. हे सगळं जोडून पाहिलं तर प्रतिएकर खर्च थेट ७०,३४० रुपयांपर्यंत पोहोचतो. आणि जर दोन एकरांवर शेती असेल, तर हा खर्च सरळ दुपटीने वाढून १,४०,६८० रुपये पर्यंत जातो.
ताजे कांदा बाजार भाव
छत्रपती संभाजीनगर :
दि. 30 नोव्हेंबर 2025 (रविवार)
शेतमाल – कांदा
आवक – 4512 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 400
जास्तीत जास्त दर – 1200
सर्वसाधारण दर – 800
दौंड – केडगाव :
दि. 30 नोव्हेंबर 2025 (रविवार)
शेतमाल – कांदा
आवक – 2890 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 100
जास्तीत जास्त दर – 2000
सर्वसाधारण दर – 1400
सातारा :
दि. 30 नोव्हेंबर 2025 (रविवार)
शेतमाल – कांदा
आवक – 206 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 1000
जास्तीत जास्त दर – 2000
सर्वसाधारण दर – 1500
जुन्नर – नारायणगाव :
दि. 30 नोव्हेंबर 2025 (रविवार)
शेतमाल – कांदा
आवक – 44 क्विंटल
जात – चिंचवड
कमीत कमी दर – 200
जास्तीत जास्त दर – 1200
सर्वसाधारण दर – 650
जुन्नर – आळेफाटा :
दि. 30 नोव्हेंबर 2025 (रविवार)
शेतमाल – कांदा
आवक – 9577 क्विंटल
जात – चिंचवड
कमीत कमी दर – 900
जास्तीत जास्त दर – 2000
सर्वसाधारण दर – 1350
पुणे :
दि. 30 नोव्हेंबर 2025 (रविवार)
शेतमाल – कांदा
आवक – 14320 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 400
जास्तीत जास्त दर – 1700
सर्वसाधारण दर – 1050
पुणे – पिंपरी :
दि. 30 नोव्हेंबर 2025 (रविवार)
शेतमाल – कांदा
आवक – 13 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 800
जास्तीत जास्त दर – 1400
सर्वसाधारण दर – 1100
पुणे – मोशी :
दि. 30 नोव्हेंबर 2025 (रविवार)
शेतमाल – कांदा
आवक – 797 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 400
जास्तीत जास्त दर – 1500
सर्वसाधारण दर – 950
वडगाव पेठ :
दि. 30 नोव्हेंबर 2025 (रविवार)
शेतमाल – कांदा
आवक – 350 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 1100
जास्तीत जास्त दर – 1900
सर्वसाधारण दर – 1400
वाई :
दि. 30 नोव्हेंबर 2025 (रविवार)
शेतमाल – कांदा
आवक – 12 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 1000
जास्तीत जास्त दर – 1700
सर्वसाधारण दर – 1500
पारनेर :
दि. 30 नोव्हेंबर 2025 (रविवार)
शेतमाल – कांदा
आवक – 13002 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 100
जास्तीत जास्त दर – 2300
सर्वसाधारण दर – 1100