Mhada Shopes Lottery : मुंबईत व्यवसाय करायचा असेल, तर स्वतःची जागा असण्याचं महत्व सांगायला नकोच. भाड्याच्या दुकानात महिन्यागणिक वाढणारं भाडं, कराराचे नियम, कधीही जागा रिकामी करण्याचा तगादा… या सगळ्यांमुळे अनेक व्यवसाय टिकून ठेवणे कठीण होऊन जाते. आज मुंबईत व्यवसाय वाढवायचा असेल किंवा व्यवसाय दीर्घकाळ करायचा असेल तर स्वतःची दुकानाची जागा किंवा स्वतःचे दुकान असणे गरजेचे आहे. पण समस्या एकच… मुंबईत स्वतःचं दुकान घेणं म्हणजे अव्वाच्या सव्वा किंमत! त्यामुळे अनेक छोटे व्यापारी, स्टार्टअप्स, तरुण उद्योजक आणि सेल्फ-एम्प्लॉयड लोकांना व्यवसायाची स्वप्नं पुढे ढकलावी लागतात. पण आता म्हाडा घेऊन आलंय एक मोठी सुवर्णसंधी.. मुंबईत परवडणाऱ्या किमतीत दुकान घेण्याची संधी उपलब्ध होत आहे. चला जाणून घेऊया संपूर्ण अपडेट..
म्हाडाच्या मुंबई मंडळाने आता घरांनंतर व्यावसायिक जागांच्या विक्रीलाही गती देण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच दुकानांसाठी स्वतंत्र ई-लिलाव प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबईत स्वतःचं दुकान घेण्याची संधी ग्राहकांसाठी खुली होणार आहे. यासाठीची अधिकृत जाहिरात पुढील 3 दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे.
येथे वाचा – सिडकोची जबरदस्त ऑफर! नवी मुंबईत फक्त 22 लाखांपासून घर.. पहा लोकेशननुसार सर्व किमती..!
यापूर्वी सप्टेंबरमध्ये म्हाडाने मुंबई शहर आणि उपनगरातील विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील 149 व्यावसायिक गाळ्यांचा ई-लिलाव जाहीर केला होता. ऑनलाईन अर्जासाठी मुदतवाढ दिली असली तरी, अनेक इच्छुकांना अर्ज करण्यास अडचणी आल्याने त्या दुकानांची विक्री पूर्ण होऊ शकली नव्हती. याच पार्श्वभूमीवर, मुंबई मंडळाने पुन्हा एकदा सुधारित लिलाव प्रक्रिया राबवून 84 दुकाने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
येथे वाचा – सिडकोची जबरदस्त ऑफर! नवी मुंबईत फक्त 22 लाखांपासून घर.. पहा लोकेशननुसार सर्व किमती..!
इथे असणार दुकाने
या ई-लिलावात ठेवण्यात येणारी दुकाने कुर्ला-स्वदेशी मिल परिसर, तुंगा पवई, कोपरी पवई, चारकोप, जुने मागाठाणे, कांदिवलीतील महावीर नगर, प्रतीक्षा नगर (शीव) आणि अँटॉप हिल या ठिकाणी आहेत. त्यामुळे मुंबईच्या विविध भागांत व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.
म्हाडाला मिळणार तब्बल हजारो घरे
कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्पामुळे स्थानिक भाडेकरू आणि इमारतमालकांसोबतच इतर मुंबईकरांसाठीही अंदाजे एक हजार नवीन घरांची निर्मिती होणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प म्हाडाच्या बांधकाम आणि विकास संस्था (C&D.A.)मार्फत राबवला जाणार आहे.
नियमांनुसार, भाडेकरू आणि इमारतमालकांना पुनर्वसन घरे दिल्यानंतर विकसकाला मिळणाऱ्या विक्रीयोग्य बांधकामापैकी 8.25 टक्के बांधीव चटई क्षेत्रफळ म्हाडाकडे हस्तांतरित होणार आहे. याच माध्यमातून सुमारे 900 ते 1000 नवीन सदनिका तयार होतील आणि त्या पुढे लॉटरी प्रणालीद्वारे मुंबईकरांना उपलब्ध होणार आहेत. कामाठीपुरा परिसर जवळपास 34 एकरांवर पसरलेला असून येथे तब्बल 943 जुन्या, जिर्णावस्थेतील इमारती आहेत. हा सर्व परिसर आधुनिक पायाभूत सुविधा आणि नव्या गृहनिर्माण संधींसह मोठ्या प्रमाणात बदलणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
येथे वाचा – सिडकोची जबरदस्त ऑफर! नवी मुंबईत फक्त 22 लाखांपासून घर.. पहा लोकेशननुसार सर्व किमती..!
प्रश्न आणि उत्तरे
प्रश्न 1 : यापूर्वी घरांसाठी लॉटरी घेणाऱ्या म्हाडा मुंबई मंडळाकडून यावेळी नेमकं कशाचा ई-लिलाव होणार आहे?
उत्तर : यावेळी म्हाडा घरांसाठी नव्हे, तर मुंबई आणि उपनगरातील गृहनिर्माण प्रकल्पांच्या परिसरातील व्यावसायिक गाळे म्हणजेच दुकाने विक्रीसाठी ई-लिलाव पद्धत वापरणार आहे.
प्रश्न 2 : या दुकानांच्या विक्रीसाठीची अधिकृत जाहिरात कधी प्रसिद्ध होणार?
उत्तर : या ई-लिलावासाठीची जाहिरात पुढील चार दिवसांत जाहीर होणार आहे.
प्रश्न 3 : या नव्या ई-लिलावात किती दुकाने उपलब्ध राहणार आहेत?
उत्तर : मुंबई मंडळाने या वेळी 84 दुकानांच्या विक्रीसाठी ई-लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.
(टीप: यापूर्वी सप्टेंबरमध्ये 149 गाळ्यांसाठी ई-लिलाव घेतला होता, मात्र अर्ज प्रक्रियेत अडचणी आल्याने विक्री पूर्ण होऊ शकली नव्हती.)
येथे वाचा – सिडकोची जबरदस्त ऑफर! नवी मुंबईत फक्त 22 लाखांपासून घर.. पहा लोकेशननुसार सर्व किमती..!
Gala sop mumbai