म्हाडाची जबरदस्त ऑफर! 5 वर्ष भाडं भरा आणि घर मिळवा..

मुंबई : मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! म्हाडाने एक अशी योजना (Mhada Scheme) आणली आहे, ज्यात तुम्ही फक्त पाच वर्षे भाडं भरून थेट त्या घराचे मालक होऊ शकता. सोडतीचं टेंशन नाही, लॉटरीत नाव लागण्याची वाट पाहायची नाही, आता घर मिळवण्याचा हा सर्वात सोपा आणि फायदेशीर मार्ग ठरू शकतो. चला जाणून घेऊया संपूर्ण अपडेट..

म्हाडाने भाडेतत्त्वावर घरे उपलब्ध करून देण्यासाठी एक नवीन स्वतंत्र धोरण तयार केले आहे. या धोरणाच्या प्रारुप मसुद्यानुसार, मुंबईसह राज्यातील विविध पुनर्विकास प्रकल्पांमधून म्हाडाला मिळणाऱ्या काही घरांची नोंद आता भाडेतत्त्वावर देण्यासाठी केली जाणार आहे. मात्र नेमकी किती टक्के घरे भाड्याने ठेवली जातील, याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप ठरलेला नाही. हा निर्णय म्हाडा पुढील काळात जाहीर करणार आहे.

मुंबईकरांना याचा मोठा फायदा होणार आहे. सोडतीत घर लागले नाही तरीही मुंबईकरांना आता म्हाडाचे घर भाड्याने घेण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, भाड्याने घेतलेले हे घर पाच वर्षांनंतर थेट मालकी हक्काने खरेदी करण्याचीही परवानगी मिळणार असल्याने अनेकांसाठी ही योजना अधिक आकर्षक ठरणार आहे.

येथे वाचा – म्हाडाची 3 दिवसात जाहिरात; मुंबईत स्वस्तात मिळणार म्हाडाचे दुकान, येथे पहा दुकानांचे लोकेशन..!

राज्य सरकारने नव्या गृहनिर्माण धोरणात भाडेतत्त्वावर घरे उभारण्याचे स्पष्ट लक्ष्य ठेवले असून, या कामासाठी म्हाडाची अधिकृत नोडल एजन्सी म्हणून निवड करण्यात आली आहे. याचबरोबर, मुंबई महानगर प्रदेशाला ‘विकास ग्रोथ हब’ म्हणून पुढे नेण्याची तयारी सुरू आहे. या वेगवान विकासामुळे एमएमआरमध्ये घरांची विशेष त: भाड्याच्या घरांची मोठी गरज निर्माण होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर म्हाडाने भाडेतत्त्वावरील गृहनिर्मितीसाठी स्वतंत्र धोरण तयार करून ते मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवले आहे.

येथे वाचा – सिडकोची जबरदस्त ऑफर! नवी मुंबईत फक्त 22 लाखांपासून घर.. पहा लोकेशननुसार सर्व किमती..!

भाड्याची घरे कोणत्या प्रकल्पातून मिळणार?

म्हाडाने बुधवारी आयोजित केलेल्या एका चर्चासत्रात भाडेतत्त्वावरील गृहनिर्मितीसाठीच्या धोरणाचा प्रारुप मसुदा सादर केला. या मसुद्यात खासगी विकासकांना या क्षेत्रात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले असून, भाड्याची घरे मोठ्या प्रमाणात उभारता यावीत यासाठी त्यांना विविध सवलती देण्याची तरतूद आहे. याशिवाय, राज्यभर भाडेतत्त्वावरील घरे उपलब्ध व्हावीत म्हणून म्हाडाच्या नव्या गृहप्रकल्पांसह पुनर्विकास प्रकल्पांमध्ये देखील भाड्याच्या घरांचा समावेश असणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

किती टक्के घरे भाड्याने?

म्हाडाचे राज्यभरातील गृहप्रकल्प तसेच सोडतीत मिळणाऱ्या घरांपैकी ठरावीक हिस्सा आता भाडेतत्त्वासाठी राखून ठेवण्याचा विचार आहे. मुंबईत तर पुढील काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास प्रकल्प राबवले जाणार असल्याने, त्यातून म्हाडाला मिळणाऱ्या अतिरिक्त घरांपैकी काही घरे भाड्याच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे. तथापि, या घरांसाठी नेमकी किती टक्केवारी राखीव ठेवायची म्हणजेच ५ टक्के, १० टक्के, १५ टक्के की त्याहून अधिक याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. ही टक्केवारी लवकरच निश्चित केली जाईल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

येथे वाचा – सिडकोची जबरदस्त ऑफर! नवी मुंबईत फक्त 22 लाखांपासून घर.. पहा लोकेशननुसार सर्व किमती..!

मुंबई आणि एमएमआर परिसरातील बहुतांश नवीन प्रकल्पांमध्ये तसेच पुनर्विकास योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भाड्याची घरे राखीव ठेवणार असल्याचे म्हाडाने स्पष्ट केले आहे. मात्र राज्यातील इतर विभागीय मंडळांमध्ये, स्थानिक मागणीचा अभ्यास केल्यानंतरच भाड्याच्या घरांचा कोटा निश्चित केला जाणार आहे. यामुळे सोडतीत घर मिळाले नाही तरीही अर्जदारांना म्हाडाचे घर घेण्याचा पर्याय खुला राहील, कारण म्हाडाचे घर भाड्याने घेण्याची सुविधा उपलब्ध असेल. या घरांचे भाडे सर्वसामान्यांना परवडणारे ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याने मुंबई आणि एमएमआरमध्ये स्वतःचे घर नसलेल्या नागरिकांसाठी ही मोठी दिलासादायक बाब मानली जाते.

5 वर्षे भाडे भरा आणि म्हाडाचे घर करा मालकीचे

म्हाडाचे घर भाड्याने घेतल्यानंतर सलग पाच वर्षे भाडे भरलेल्या भाडेकरूला ते घर मालकी हक्काने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ही विक्री शीघ्रगणक दरानुसार केली जाणार असून, घराच्या एकूण किमतीतून त्या पाच वर्षांचे भरलेले भाडे सरळ वजा केले जाईल. त्यामुळे अत्यंत कमी खर्चात भाड्याचे घर पाच वर्षांनंतर मालकीचे होण्याचा मार्ग खुला होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

1 thought on “म्हाडाची जबरदस्त ऑफर! 5 वर्ष भाडं भरा आणि घर मिळवा..”

Leave a Comment

Join WhatsApp Group