नवीन फ्लॅट घेताना हे 3 स्कॅम ओळखा… नाहीतर लाखो रुपये बुडतील..

Real Estate Mumbai : मुंबई पुण्यात घर घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण आजकाल काही ब्रोकर्स अशा ट्रिक्स वापरतात ज्या पहिल्या नजरेत अगदी सामान्य वाटतात… पण त्यांच्या मागे मोठा खेळ लपलेला असतो. अनेक घर खरेदीदार नकळत त्या जाळ्यात अडकतात आणि नंतर लक्षात येतं की निर्णय घाईने झाला होता, माहिती अपूर्ण होती आणि अनेक गोष्टी आधी सांगितल्याच नव्हत्या. सगळ्यात धक्कादायक म्हणजे—हे सगळं इतकं स्मूद पद्धतीने केलं जातं की अनुभवी लोकदेखील कधीकधी फसतात.

खालचे तीन पॉइंट्स वाचण्यापूर्वी एकच लक्षात ठेवा:
जर तुम्ही हे सिग्नल ओळखले नाहीत, तर कुणीही तुम्हाला सहज स्कॅम करू शकतो. पण एकदा हे समजले… तर ब्रोकर कितीही स्मार्ट असला तरी तुम्हाला फसवू शकणार नाही.

पॉइंट नं. 1 – प्रेशर टॅक्टिक्स

रिअल–एस्टेटमध्ये हे प्रेशर टॅक्टिक्स खूप कॉमन आहेत.
फ्रॉड ब्रोकर नेहमी अशी परिस्थिती निर्माण करतात की तुम्हाला लगेचच निर्णय घ्यावा लागेल असं वाटावं.
ते तुम्हाला वेळच देत नाहीत विचार करायला. “दुसरा बायर टोकन घेऊन उभा आहे…” “फक्त शेवटची काही युनिट उरली आहेत…” “बाकी सगळ्या फ्लॅट्सचा सेल झाला आहे…” असे डायलॉग्स तुम्ही कित्येक वेळा ऐकले असतील. पण वास्तविकता अशी असते की हे सगळं केवळ तुम्ही घाईघाईत निर्णय घ्यावा आणि तुम्ही प्रॉपर्टी तपासण्याआधीच बुकिंग करावी यासाठी हा खेळ केलेला असतो.

येथे वाचा – म्हाडा देणार होम लोन; फक्त एवढ्या टक्के दराने मिळेल लोन..!

पॉइंट नं. २ – हिडन चार्जेस

हे तर बरेच घर खरेदीदार शेवटी अडकतात तेव्हा लक्षात येतं. सुरुवातीला ऑफर, किंमत आणि स्कीम अतिशय आकर्षक वाटते… पण नंतर बिलामध्ये काही नवीन चार्जेस दिसायला लागतात. उदाहरणार्थ—पार्किंग चार्ज, फ्लोअर राइज, क्लबहाऊस फी, जीएसटी, आणि पझेशन मिळेपर्यंतचा मेंटेनन्स. हे सगळे आधी सांगितलेच जात नाहीत, आणि नंतर “हे तर सर्व प्रोजेक्टमध्ये असतंच” असं सांगून गोष्ट पुढे ढकलली जाते. म्हणूनच एक छोटासा नियम लक्षात ठेवा:
पूर्ण प्राइस ब्रेकअप नेहमी लिखित स्वरूपात घ्या.
मौखिक बोलण्यावर कधीच अवलंबून राहू नका.

येथे वाचा – म्हाडाची बंपर स्कीम! 14 लाखाच्या फ्लॅट्ससाठी धडाकेबाज लॉटरी सुरू..

पॉइंट नं. ३ – डॉक्युमेंट अ‍ॅक्सेस

हे तंत्र त्याहूनही जास्त धोकादायक आहे.
कारण इथे थेट तुमचे आणि प्रोजेक्टचे सर्वात महत्त्वाचे पुरावे—डॉक्युमेंट्स—लपवले जातात. काही ब्रोकर नेहमी सांगतात: “पेपरवर्क आम्ही सांभाळू… तुम्हाला बघायची गरज नाही.” हे ऐकून काही लोक रिलॅक्स होतात. पण इथेच खरी गडबड असते.

येथे वाचा – म्हाडा देणार होम लोन; फक्त एवढ्या टक्के दराने मिळेल लोन..!

अनेक वेळा टायटल डीड, मंजूर नकाशा (Approval Plan), OC/CC, RERA डॉक्युमेंट्स काहीच दाखवले जात नाहीत. ब्रोकर फक्त एकच डायलॉग मारतात—“बिल्डर देईल… काळजी करू नका.” पण लक्षात ठेवा, डॉक्युमेंट्स न दाखवणारा ब्रोकर कधीही विश्वासार्ह नाही. सगळी कागदपत्रे स्वतः पाहा, त्यांची कॉपी मागा, आणि शंका आल्यास तज्ञ सल्ला घ्या.

1 thought on “नवीन फ्लॅट घेताना हे 3 स्कॅम ओळखा… नाहीतर लाखो रुपये बुडतील..”

Leave a Comment

Join WhatsApp Group