BMC housing lottery : म्हाडाच्या घरांच्या लॉटरीसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात अर्ज येतात, पण बीएमसीच्या घरांसाठी मात्र लोकांचा उत्साह दिसत नाही. हे घर चांगले नाहीत किंवा लोकांना पसंत नाहीत असे नाही; मात्र या घरांच्या किमती इतक्या जास्त आहेत की अर्जांची संख्या अत्यल्प राहिली आहे. ४२६ घरांसाठी फक्त १,९४३ अर्ज आले आहेत.
मुंबईतील ७४ हजार कोटी रुपयांचे बजेट असलेल्या बीएमसीच्या पहिल्याच लॉटरीत समाविष्ट घरांच्या किमती इतक्या प्रचंड आहेत की ही घरे सर्वसामान्य मुंबईकरांच्या आवाक्याबाहेर गेली आहेत. कदाचित याच कारणामुळे बीएमसीच्या ४२६ घरांसाठी फक्त १,९४३ लोकांनीच डिपॉझिट रक्कम भरली आहे.
लॉटरीसाठी लॉगिन करण्याची अंतिम तारीख १४ नोव्हेंबर होती. हाउसिंग तज्ञांच्या मते बीएमसीच्या लॉटरीला अत्यंत थंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यांनी म्हाडा मुंबई बोर्डाच्या लॉटरीचे उदाहरण देत सांगितले की बीएमसीला मिळालेला प्रतिसाद हा खूपच कमी आहे.
१६ ऑक्टोबरपासून अर्ज सुरू
बीएमसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की कमी दिवसांत पहिली लॉटरी असूनही प्रत्येक घरासाठी सरासरी ५ अर्ज आले आहेत, जे त्यांच्या मते चांगले आहे. बीएमसीने प्रॉजेक्ट अफेक्टेड पीपल (PAP) अंतर्गत मिळालेल्या ४२६ घरांची लॉटरी काढण्याचा निर्णय घेतला होता. १६ ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली. बीएमसीच्या माहितीनुसार १४ नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत २६,४६६ लोकांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २,६५८ लोकांनी १,१८० रुपयांचे शुल्क भरून फॉर्म जमा केले आणि १,९४३ लोकांनी ११,००० रुपयांची डिपॉझिट रक्कम भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण केली.
कर्जाच्या अटी काय आहेत?
बीएमसीच्या घरांची किंमत ५४ लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत आहे. ही घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट (EWS) आणि कमी उत्पन्न गट (LIG) यांच्यासाठी आहेत. हाउसिंग तज्ञ सांगतात की EWS साठी वार्षिक उत्पन्न मर्यादा ६ लाख रुपये आणि LIG साठी ९ लाख रुपये ठरवली आहे. या उत्पन्नाच्या आधारावर ६ लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या व्यक्तीस जास्तीतजास्त ३० लाख रुपयांचेच कर्ज मिळू शकते. अशा परिस्थितीत फ्लॅटची किंमत ५४ लाख रुपये असल्यास उर्वरित रक्कम कुठून आणणार हा प्रश्न निर्माण होतो.
म्हाडाच्या लॉटरीला अधिक प्रतिसाद
मुंबईतील एका वरिष्ठ हाउसिंग तज्ञांनी सांगितले की शहरात जर लॉटरीसाठी ५०,००० पेक्षा जास्त अर्ज आले नाहीत तर तो प्रतिसाद थंड मानला जातो. त्यांनी उदाहरण देताना सांगितले की २०१६ साली म्हाडाने ९७२ घरांची लॉटरी काढली होती, ज्यासाठी १ लाख ६९ हजार लोकांनी डिपॉझिट रक्कम भरून अर्ज केले होते. २०२३ मध्ये म्हाडाच्या ४,०८२ घरांसाठी १ लाखाहून अधिक अर्ज आले होते. तर २०२४ मध्ये मुंबई बोर्डासाठी काढलेल्या २,०३० घरांच्या लॉटरीसाठी १ लाख २९ हजार अर्ज आले होते. सरासरी पाहता प्रत्येक घरासाठी २० ते २५ जणांनी आपले नशीब आजमावले होते.
Last da
te of form submission
Mala form bhraycha ahye
What if I don’t have salary slip.
Accurate hai 👌
लवकरात लवकर कळवावे मराठी माणसांना घर मिळावी यासाठी प्रयत्न करा महाडा
निव्वळ मूर्खपणा म्हणावा की चलाखी ?
अल्प उत्पन्न गटांना एवढी महाग घरे कशी परवडतील ?
Inform me.