अतिवृष्टी अनुदानाचे वाटप सुरू; या शेतकऱ्यांचे पैसे जमा होणार..

अतिवृष्टी अनुदान : खरीप २०२५ मधील अतिवृष्टीने राज्यातील शेतीला मोठा फटका बसल्यानंतर सरकारने घोषित केलेल्या मदत पॅकेजनुसार पात्र शेतकऱ्यांना अनुदान दिले जात आहे. मात्र, अनेकांना अजूनही हक्काची रकम मिळालेली नाही. फार्मर आयडी पेंडिंग असणे, खातेदारांचा मृत्यू किंवा सामायिक खात्यांशी संबंधित अडचणी—ही काही प्रमुख कारणे अद्याप अनेक शेतकरी मदतीपासून दूर राहण्यामागे आहेत.

ही प्रक्रिया गतीमान करण्यासाठी २१ नोव्हेंबर २०२५ रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक झाली. जिल्हाधिकाऱ्यांना त्वरित अनुदान वितरण पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते, तसेच लाभार्थी व केवायसी प्रलंबितांच्या याद्या जाहीर करण्याचे निर्देशही देण्यात आले. काही दिवसांत कामाला सुरुवात झाली, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा आला आणि वितरण प्रक्रियेला ब्रेक लागला. त्यामुळे केवायसी पूर्ण केलेले शेतकरीसुद्धा प्रतीक्षेतच राहिले.

दरम्यान, नैसर्गिक आपत्तीच्या अनुदानावर आचारसंहितेची कोणतीही अडचण नसल्याने प्रशासनाने ही मोहीम आता पुन्हा जोरात सुरू केली आहे. खासदारांकडून हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा मांडला जाण्याची शक्यता लक्षात घेऊन, वितरण लवकरात लवकर पूर्ण करण्याची तयारी सुरू आहे.

येथे वाचा – शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जून 2026 पर्यंत कर्जमाफी निश्चित.. पण पुढची अट धक्का देणारी!

याच पार्श्वभूमीवर ३ ते ५ डिसेंबर २०२५ दरम्यान राज्यभर ‘विशेष केवायसी मोहीम’ राबवली जात आहे. अहिल्यानगर (८५,०००), सोलापूर (८५,०००), बीड (६३,०००) या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक शेतकरी केवायसी प्रलंबित आहेत. त्यामुळे ज्यांची कागदपत्रे राहिली आहेत, त्यांनी लगेच तलाठी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

सर्व काही नियोजनानुसार पार पडल्यास, ५ डिसेंबरपासून केवायसी पूर्ण झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

Join WhatsApp Group