सिडकोची योजना धडाक्यात! 48 तासांत तब्बल एवढ्या अर्जदारांची नोंदणी.. तुम्ही अर्ज केला का?

नवी मुंबई : तळोजा केंद्रस्थानी असलेल्या सिडकोच्या ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या नवीन घरविक्री योजनेला सुरुवातीपासूनच जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. २२ नोव्हेंबरपासून ऑनलाइन नोंदणीला सुरूवात झाल्यानंतर केवळ दोन दिवसांतच नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली. पहिल्या ४८ तासांत तब्बल ७,५५५ जणांनी नोंदणी करून कागदपत्रांची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती सिडकोकडून देण्यात आली. (Cidco Housing Scheme Navi Mumbai)..

सिडकोने तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली या नोड्समध्ये असलेली ४,५०८ रेडी-टू-मूव्ह घरे या योजनेत विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहे. आर्थिक दुर्बल घटक (EWS) आणि अल्प उत्पन्न गट (LIG) या दोन्ही श्रेणींसाठी ही घरे खुली असून, त्यांची किंमत २२ लाख ते ३६ लाख रुपयांच्या दरम्यान ठेवण्यात आली आहे.

वेगवेगळ्या लोकेशन नुसार किमती पाण्यासाठी
येथे क्लिक करा

सिडकोच्या इतिहासात प्रथमच ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर योजना आणण्यात आली असल्याने अर्जदारांकडून उत्सुकता आणि तत्परता स्पष्टपणे जाणवत आहे. संपूर्ण रक्कम भरताच त्वरित ताबा देण्याची सुविधा असल्यामुळे घर शोधणाऱ्यांसाठी ही संधी अधिक आकर्षक ठरत आहे. या योजनेची नोंदणी २१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार असून २८ डिसेंबर रोजी पात्र अर्जदारांना स्वतःची पसंतीची सदनिका निवडण्याची संधी मिळणार आहे.

येथे वाचा – म्हाडाची 3 दिवसात जाहिरात; मुंबईत स्वस्तात मिळणार म्हाडाचे दुकान, येथे पहा दुकानांचे लोकेशन..!

फक्त दोन दिवसांतच ७,५५५ नागरिकांनी या गृहनिर्माण योजनेसाठी उत्सुकता दाखवत नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. संपूर्ण प्रक्रियेसाठी सिडकोने एक महिन्याची मुदत ठेवली असून, मिळत असलेल्या प्रतिसादावरून ही योजना किती लोकप्रिय ठरत आहे, हे स्पष्टच आहे. या माध्यमातून सिडकोच्या गृहनिर्माण प्रकल्पांवरील विश्वास आणि मागणी पुन्हा अधोरेखित झाली आहे, अशी माहिती सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी दिली आहे.

Leave a Comment

Join WhatsApp Group