PM Awas Yojana 2025: आपले स्वतःचे हक्काचे पक्के घर असावे, हे अनेक कुटुंबांच स्वप्न असते. मातीच्या घरात पावसाळ्यात होणारे त्रास, गळके छप्पर, सुरक्षिततेची काळजी आणि वाढत्या महागाईत घर बांधण्याचा खर्च, हे सगळं प्रत्येक ग्रामीण कुटुंब अनुभवत असतं. अशाच कुटुंबांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठी घोषणा केली असून प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण (PMAY-G) 2025 साठीची अपडेटेड लाभार्थी यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.
2016 मध्ये इंदिरा आवास योजनेचे रूपांतर होऊन सुरू झालेली PMAY-G योजना ग्रामीण कुटुंबांना दिलासा देणारी ठरली. कच्च्या घरात राहणाऱ्या, आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना सुरक्षित, पक्के आणि उज्ज्वल भविष्य देणारे स्वतःचे घर उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. ग्रामीण विकास मंत्रालयाच्या माहितीनुसार, योजनेअंतर्गत आजवर 3 कोटीहून अधिक घरे मंजूर झाली आहेत, ही आकडेवारीच या योजनेची पारदर्शकता आणि परिणामकारकता सांगून जाते.
सरकारचं Housing for All हे मोठं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 2029 पर्यंत जवळपास 2.95 कोटी घरे पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, मैदानी भागातील कुटुंबांना ₹1.20 लाख, तर डोंगराळ किंवा दुर्गम भागातील कुटुंबांना ₹1.30 लाख इतकी आर्थिक मदत घर बांधण्यासाठी दिली जाते.
योजनेतील महत्वाचे अपडेट्स
AwaasApp: घराच्या बांधकामाची live माहिती तुमच्या मोबाईलवर! सरकारने लाभार्थ्यांसाठी AwaasApp उपलब्ध केले असून, या अँड्रॉइड अॅपद्वारे तुम्ही तुमच्या घराच्या बांधकामाची प्रत्येक पायरी थेट मोबाईलवर पाहू शकणार आहात. जिओ-टॅगिंग, फोटो अपडेट्स, तक्रार निवारण, सर्व काही एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे!
दुसरी यादीही लवकरच!
पहिल्या यादीत नाव न आल्यास काळजी करू नका. सरकारने स्पष्ट सांगितले आहे की एका महिन्याच्या आत दुसरी यादीही जाहीर केली जाईल. त्यामुळे अजूनही लाखो कुटुंबांना ही संधी उपलब्ध आहे. गरजूंना न्याय मिळावा आणि अपात्र व्यक्तींचा समावेश होऊ नये, यासाठी सर्व राज्यांमध्ये घरोघरी नवीन सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणात समावेश झाल्यानंतरच तुमचे नाव यादीत नोंदवले जाऊ शकते.
PMAY-G साठी कोण पात्र?
जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर खालील निकष आवश्यक आहेत :
- कुटुंब ग्रामीण भागातील निवासी असावे
- पक्के घर नसलेले कुटुंब
- SC/ST, OBC, अल्पसंख्याक, EWS किंवा भूमिहीन मजूर श्रेणीतील कुटुंब
- आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना प्राधान्य
- कुटुंबात सरकारी सेवेत असलेला सदस्य नसावा
जर तुमचे नाव अद्याप यादीत नसले, तरी तुम्ही जवळच्या CSC केंद्रात किंवा PMAY-G च्या अधिकृत पोर्टलवरून अर्ज करू शकता. अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
PMAY-G 2025 यादीत आपले नाव कसे तपासाल?
नोंदणी क्रमांक नसतानाही नाव शोधणे अत्यंत सोपे आहे:
- PMAY-G अधिकृत वेबसाइट pmayg.nic.in उघडा.
- त्यानंतर Stakeholders वर क्लिक करा.
- आता IAY/PMAYG Beneficiary किंवा Search Beneficiary निवडा.
- रजिस्ट्रेशन नंबर नसल्यास Advanced Search हा पर्याय निवडा.
- आता राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा.
- शेवटी कॅप्चा टाकून Submit करा.
यानंतर स्क्रीनवर तुमच्या गावाची संपूर्ण लाभार्थी यादी दिसेल, जिथे घर मंजूर झाले आहे का, बांधकामाची स्थिती काय आहे, हप्ते किती मिळाले आहेत, या सगळ्याची माहिती तुम्हाला स्पष्ट दिसेल.