खुशखबर! नवी मुंबईत सिडकोच्या 4,508 घरांसाठी अर्ज सुरू; या ठिकाणी करा अर्ज..!

CIDCO flats Navi Mumbai : सिडकोकडून यंदा एक भन्नाट अपडेट आलंय! पहिल्यांदाच ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर तब्बल 4,508 घरांची मोठी योजना जाहीर करण्यात आली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सिडकोच्या या योजनेसाठी आज (22 नोव्हेंबर) दुपारी 4 वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे तुम्ही आता अर्ज करू शकता. ही घरे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत EWS आणि LIG गटांसाठी खास ठेवण्यात आली आहेत. नवी मुंबईतील तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली या परिसरातील सिडकोच्या गृहसंकुलांमध्ये ही 4,508 घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे पहिल्यांदाच तुम्हाला तुमची पसंतीची सदनिका स्वतः निवडण्याचं स्वातंत्र्य मिळणार आहे. म्हणजे एखादं घर आवडलं—तर बस! लगेच बुक करा. हीच गोष्ट या योजनेला आणखी खास बनवते.

सिडकोने नेहमीच सर्व आर्थिक स्तरांतील नागरिकांसाठी परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. त्यातच आता तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली येथील प्रकल्पांमधील उर्वरित 4,508 सदनिका विक्रीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. या घरांपैकी 1,115 घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी, तर 3,393 घरे अल्प उत्पन्न गटासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, ईडब्ल्यूएस गटातील अर्जदारांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 2.50 लाखांचे अनुदान मिळण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

या योजनेतील सर्वच घरं रेडी टू मूव्ह आहेत, म्हणजेच ताबडतोब राहायला तयार. अर्जदारांना यामध्ये स्वतःच्या आवडीचं घर निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं जात आहे. विक्री प्रक्रिया देखील अगदी सरळ—‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या पद्धतीवरच घरे दिली जाणार आहेत. सदनिकेची संपूर्ण किंमत भरताच अर्जदाराला तात्काळ ताबा मिळणार आहे. कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर पात्र ठरलेल्या अर्जदारांना त्यांच्या पसंतीचे घर निवडण्याची संधी दिली जाणार आहे.

येथे वाचा – मुंबईकरांनो! पैसे तयार ठेवा; 10% रक्कम भरून म्हाडाचे घर मिळणार, संधी सोडू नका..!

या योजनेअंतर्गतची सर्व घरे नवी मुंबईतील पूर्णपणे विकसित नोड्समध्ये आहेत, जिथे दैनंदिन गरजांच्या सर्व मूलभूत सुविधा सहज उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, हे प्रकल्प नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी जवळ असल्याने त्यांची लोकेशन आणखी आकर्षक ठरते. याशिवाय, उपनगरीय रेल्वे, मेट्रो मार्ग आणि प्रमुख महामार्गांमुळे या परिसरांना उत्तम कनेक्टिव्हिटी मिळाली आहे, ज्यामुळे प्रवासही सोपा आणि जलद होतो.

येथे करा घरासाठी अर्ज

ऑनलाइन अर्जांसाठी सिडकोने cidcofcfs.cidcoindia.com हे विशेष संकेतस्थळ उपलब्ध करून दिलं आहे. घरांची माहिती जसे की क्षेत्रफळ, किंमत आणि इतर सर्व तपशील याच वेबसाईटवर पाहता येणार आहेत.

या योजनेसाठी ऑनलाइन फॉर्म भरणे आज (22 नोव्हेंबर) दुपारी चार वाजेपासून सुरू झाले आहे. महत्वाचं म्हणजे 21 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज करणाऱ्या पात्र अर्जदारांना 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून आपली पसंतीची सदनिका निवडण्याची संधी मिळेल. सदनिकांची विक्री पूर्णपणे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर होणार असल्यामुळे सिडकोने इच्छुकांना वेळ न दवडता लवकरात लवकर अर्ज करण्याचं आवाहन केलं आहे. एकंदरीत, जो आधी अर्ज करेल त्याच्या घराची स्वप्नपूर्ती आधी होईल.

येथे वाचा – मुंबईकरांनो! पैसे तयार ठेवा; 10% रक्कम भरून म्हाडाचे घर मिळणार, संधी सोडू नका..!

“सिडकोच्या सर्व सुविधा असलेल्या गृहसंकुलांमधील 4,508 सदनिका या योजनेतून नागरिकांसाठी खुल्या केल्या आहेत. यातील सर्वात मोठा बदल म्हणजे—सोडत नाही, लॉटरी नाही, थेट आपल्या आवडीचं घर स्वतः निवडण्याची मुभा अर्जदारांना मिळणार आहे. त्यामुळे लोकांना अक्षरशः त्यांच्या मनातलं घर प्रत्यक्षात घेण्याची संधी मिळतेय.

नवी मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगाने विकसित होत असलेल्या शहरात परवडणाऱ्या किमतीत घर घेण्याची ही पुन्हा एकदा उत्तम संधी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा,”
असं आवाहन सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केलं.

3 thoughts on “खुशखबर! नवी मुंबईत सिडकोच्या 4,508 घरांसाठी अर्ज सुरू; या ठिकाणी करा अर्ज..!”

Leave a Comment

Join WhatsApp Group