पुण्यात 7 लाखात म्हाडाचं घर हवंय? आज शेवटची संधी.. ताबडतोब इथे करा अर्ज..!

Mhada Flats Pune : पुण्यात स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण म्हाडाच्या पुणे बोर्डाच्या 4,186 घरांसाठी अर्ज करण्याची आज (20 नोव्हेंबर) अंतिम तारीख आहे. ही घरं अतिशय परवडणाऱ्या किमतींमध्ये उपलब्ध आहेत आणि यातील सर्वात स्वस्त घरांची किंमत सुमारे 6 लाख 95 हजार या किमतींपासून सुरू होते आणि ही घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेतील आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी https://lottery.mhada.gov.in व  https://bookmyhome.mhada.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. इतर घरांच्या किंमती सुमारे 9 लाख 95 हजार यापासून ते 12 लाखांपर्यंत आहेत. पुण्यात स्वस्तात घर शोधणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. आणि खरं म्हणजे ही संधी फक्त आजच्या दिवसापुरती मर्यादित आहे.

आज या वेळेपर्यंत अर्ज करता येणार..

या योजनेतर्गत अर्जासाठी आज रात्री 11:59 वाजेपर्यंत अर्ज नोंदणी करणे गरजेचे आहे. अर्ज भरल्यानंतर अनामत रक्कम भरण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर आहे.

पुणे बोर्डाच्या 4,186 परवडणाऱ्या घरांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आजच असल्याने, सकाळपासून हजारो अर्जदार पोर्टलवर गर्दी करत आहेत. कमी किंमतीत चांगल्या लोकेशनमध्ये घर घेण्याची ही सुवर्णसंधी असल्याने पुणेकर या लॉटरीसाठी उत्सुक आहे. तुम्हाला या घरांसाठी अर्ज करायचा असेल तर म्हाडाची अधिकृत वेबसाईट https://housing.mhada.gov.in

फॉर्म भरताना अडचणी.. तारीख वाढणार?

कालपासून अनेकांना फॉर्म भरताना अडचणी येत आहे. “Unable to submit form” असा error येऊ लागला आहे. त्यामुळे फॉर्म भरण्यासाठी तारीख वाढू शकते, असा देखील अंदाज वर्तवण्यात येत आहे.

या दिवशी सोडत काढण्यात येणार

4186 घरांसाठी संगणकीय सोडत पुढील महिन्यात म्हणजेच 11 डिसेंबर, 2025 रोजी दुपारी 12.00 वाजता काढण्यात येणार आहे

Leave a Comment

Join WhatsApp Group