Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखो महिला भगिनींसाठी हा डिसेंबर महिना मोठा दिलासा घेऊन आला आहे. गेल्या काही दिवसांत ई-केवायसी न झाल्यामुळे अनेक महिलांच्या मनात भीती होती, आपला हप्ता थांबेल का?, बँकेत दर महिन्यासारखे १५०० रुपये जमा होतील का? अशा कितीतरी प्रश्नांनी अनेक जणी चिंतेत होत्या. पण आता सरकारकडून स्पष्ट आणि खात्रीशीर माहिती मिळाली असून, ही माहिती प्रत्येक बहिणीपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे.
सरकारने दिलेल्या ताज्या अपडेटनुसार, नोव्हेंबर महिन्याचा १७ वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा १८ वा हप्ता मिळवण्यासाठी महिलांना ई-केवायसी करणे बंधनकारक नाही. त्यामुळे ज्यांची ई-केवायसी अजून बाकी आहे, त्यांच्यासाठी ही खऱ्या अर्थाने दिलासादायक बातमी आहे. त्यामुळे दोन्ही महिन्यांचे १५०० चे हप्ते कोणत्याही अडथळ्याशिवाय थेट बँक खात्यात जमा होणार आहेत. म्हणजेच, नोव्हेंबर-डिसेंबरचा लाभ न थांबता महिलांच्या खात्यात पोहोचणार आहे.
परंतु, यात एक महत्त्वाची अट आहे जी प्रत्येक महिलेनं लक्षात ठेवणे गरजेचे आहे. जानेवारी महिन्यापासूनचा पुढील हप्ता वेळेवर मिळवण्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. सरकारने ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी मुदत वाढवून दिली असून, ही अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. ही मुदत मोठी असल्यामुळे महिलांना कोणताही दबाव न ठेवता आरामात प्रक्रिया पूर्ण करता येईल, परंतु वेळ निघून गेल्यानंतर हप्ता थांबू नये म्हणून ई-केवायसी लवकर पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
अनेक महिला ई-केवायसी प्रक्रिया अवघड आहे असे समजतात, पण प्रत्यक्षात ही प्रक्रिया अतिशय सोपी, जलद आणि २ मिनिटांत मोबाईलवरून पूर्ण करता येणारी आहे. यासाठी योग्य सूचना व मार्गदर्शन असलेला व्हिडिओ पाहिल्यास कुणालाही ही प्रक्रिया सहज करता येते. फक्त आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि बँक डिटेल्स जवळ ठेवा, आणि काम झटपट होऊन जाते.
महिलांसाठी हप्ता वेळेत मिळणे किती महत्त्वाचे आहे हे सरकारलाही माहीत आहे. म्हणूनच नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते ई-केवायसीशिवाय देण्याचा निर्णय महिलांसाठी मोठा दिलासा ठरला आहे. आता फक्त एकच गोष्ट करा ती म्हणजे, ३१ डिसेंबर 2025 पूर्वी तुमची e-KYC नक्की पूर्ण करा, जेणेकरून जानेवारीपासूनचा एकही हप्ता चुकणार नाही. योजनेंतर्गत मिळणाऱ्या लाभांचा कोणताही अडथळा येऊ नये यासाठी ही माहिती प्रत्येक बहिणीपर्यंत अवश्य पोहचवा.