Mhada Lottery 2025 : सामान्य उत्पन्न गटातील लोकांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देण्याचे काम म्हाडा सातत्याने करताना दिसतो. राज्य सरकारच्या या संस्थेमार्फत मुंबईपासून ते राज्यातील अनेक शहरांमध्ये घरांच्या लॉटरी जाहीर केल्या जातात. मात्र सध्याच्या बाजार परिस्थितीत म्हाडाच्या घरांचे दरही बर्यापैकी वाढले आहेत, तरीही खासगी बांधकामदारांच्या प्रकल्पांच्या तुलनेत हे भाव तुलनेने कमी मानले जातात.. अशात आता म्हाडाने प्राईम लोकेशनवर फक्त 14 लाखात घरे उपलब्ध करून दिली आहेत. चला जाणून घेऊया म्हाडाच्या योजनेबद्दल संपूर्ण माहिती..
घराचे लोकेशन आणि किंमत
आतापर्यंत लॉटरी काढून घरे विकणाऱ्या म्हाडाकडून आता आगाऊ नोंदणीच्या आधारे घरे बांधण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. या नवीन पद्धतीची अंमलबजावणी प्रथम नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ हा म्हाडाचा विभागीय घटक करणार आहे. यानुसार नाशिक शहरातील चुंचाळे, पाथर्डी, मखमलाबाद, आडगाव आणि सातपूर शिवारा परिसरातील विविध प्रकल्पांमध्ये उभारण्यात येणाऱ्या ४०२ घरांची विक्री आगाऊ नोंदणी तत्त्वावर होणार आहे.
या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सोमवारी (१ तारखेपासून) अधिकृतपणे सुरू झाली. वांद्रे (पूर्व) येथील म्हाडा मुख्यालयात आयोजित ‘गो लाइव्ह’ कार्यक्रमात म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजिव जयस्वाल यांनी या उपक्रमाचा शुभारंभ केला. या घरांची किंमत साधारण 14 लाखांपासून 36 लाखांपर्यंत ठेवण्यात आली आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल यांनी सोमवारी वांद्रे येथील मुख्यालयात या लॉटरीसाठी नोंदणी आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रियेचा औपचारिक शुभारंभ केला. परवडणाऱ्या गृहप्रकल्पांना चालना देण्यासाठी म्हाडाकडून जाहीर करण्यात आलेली ही आतापर्यंतची चौथी लॉटरी आहे. विशेष म्हणजे, ज्या घरांसाठी लॉटरी काढली जात आहे ती अद्याप बांधकामाधीन असून, विजेत्यांना घराचे पैसे पाच टप्प्यांत भरावे लागणार आहेत.
येथे वाचा – म्हाडाचे प्लॉट मिळणार; 15 दिवसात जाहिरात, पहा प्लॉटची साईज आणि लोकेशन..!
अल्प उत्पन्न गटासाठी किती घरे?
अल्प उत्पन्न गटासाठी एकूण 293 घरे उपलब्ध होणार आहेत. यामध्ये चुंचाळे शिवारा येथील 138, पाथर्डीतील 30, मखमलाबाद परिसरातील 48, तर आडगाव शिवाऱ्यातील 77 घरांचा समावेश आहे.
दरम्यान, मध्यम उत्पन्न गटासाठीही 109 घरांची व्यवस्था करण्यात आली आहे. यात सातपूर शिवारा येथील 40, पाथर्डी परिसरातील 35, आणि आडगाव भागातील 34 घरांचा समावेश आहे.
येथे वाचा – म्हाडाची जबरदस्त ऑफर! 5 वर्ष भाडं भरा आणि घर मिळवा..
येथे करा अर्ज
इच्छुकांनी https://housing.mhada.gov.in किंवा https://mhada.gov.in या संकेतस्थळांवर जाऊन ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे. अर्ज नोंदणी आणि फॉर्म सादर करण्याची अंतिम मुदत २३ डिसेंबर, रात्री ११.५९ वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. याच वेळेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अनामत रकमेचे पेमेंटही करता येणार आहे. तसेच, २४ डिसेंबर रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेत अर्जदारांना RTGS किंवा NEFT द्वारे अनामत रक्कम जमा करण्याची मुभा असल्याचे म्हाडाने स्पष्ट केले आहे.
कोणते कागदपत्र लागणार?
अर्जदारांनी 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीतले उत्पन्न सिद्ध करणारा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न किंवा तहसील कार्यालयातून मिळणारे उत्पन्न प्रमाणपत्र या दोन्हीपैकी कोणताही दस्तऐवज स्वीकारला जाणार आहे.
How to get forms