शेतकऱ्यांसाठी खुशखबर! या ॲपवर नोंदणी करा आणि सोयाबीन, कापूस हमी भावात विका..!

हंगाम २०२५-२६ साठी कापूस, सोयाबीन आणि मका हमीभावाने विक्री करता यावी, यासाठी भारतीय कापूस निगम लिमिटेडने कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी किसान मोबाइल अॅप माध्यमातून पूर्वनोंदणीची सोय सुरू केली आहे.

सोयाबीन विक्रीसाठी ई-समृद्धी अॅप, तर मक्यासाठी स्वतंत्र ऑनलाइन लिंक उपलब्ध करून देण्यात आली असून, शेतकऱ्यांनी या डिजिटल सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे. दरम्यान, १ डिसेंबर रोजी प्रधान सचिव (सहकार व पणन) यांनी दुरदृष्य प्रणालीद्वारे संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेतला. शेतकऱ्यांना त्यांचा कापूस, सोयाबीन आणि मका हमी भावात विकता यावा, यासाठी शासनाने ही व्यवस्था उभारली आहे.

कापूस विक्रीसाठी कपास किसान अॅप आणि सोयाबीनसाठी ई-समृद्धी अॅपवर शेतकऱ्यांना नोंदणीची सुविधा उपलब्ध होणार आहे. हमीभावाने कापूस खरेदी प्रक्रिया सुरळीत व्हावी म्हणून भारतीय कपास निगम लिमिटेडने कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कपास किसान अॅपद्वारे पूर्वनोंदणी सुरू केली आहे. सोयाबीनसाठी सोसायटी नोंदणी ई-समृद्धी अॅपवर, तसेच शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत ऑनलाइन नोंदणी अनिवार्य असल्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांनी वेळेत या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

कापूस खरेदीची ८ केंद्रे (cotton Rates) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड, बालानगर (ता. पैठण), सिल्लोड, सोयगाव, शिऊर बाजार (ता. वैजापूर), खामगाव (ता. फुलंब्री), गंगापूर आणि लासूर (ता. गंगापूर) या ठिकाणी एकूण ८ कापूस खरेदी केंद्रे कार्यरत आहेत.

सोयाबीन खरेदीसाठी ९ ठिकाणी व्यवस्था : छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, वैजापूर, खुलदाबाद, कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री आणि संत ज्ञानेश्वर कृषी सेवा सहकारी संस्था या मिळून ९ ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू आहेत.
हंगाम २०२५-२६ साठी सोयाबीनची नोंदणी किमान आधारभूत दरानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती, सिल्लोड आणि आकाश अ‍ॅग्रो शेतकरी उत्पादक कंपनी — या दोन संस्थांमध्ये सुरु आहे.

मका खरेदीसाठी ११ केंद्रे सक्रिय : मक्याच्या खरेदीसाठी छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, लासूर स्टेशन, वैजापूर, खुलदाबाद, कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, संत ज्ञानेश्वर कृषी सेवा सहकारी संस्था (पाचोड) आणि वीर महिला क्रांती शेतकरी कंपनी, शिवना या ठिकाणी एकूण ११ खरेदी केंद्रे उपलब्ध आहेत. या सर्वच केंद्रांवर मक्याची नोंदणी सध्या सुरू आहे.

Leave a Comment

Join WhatsApp Group