MHADA Plots Mumbai : मुंबईतील विविध ठिकाणांवरील ८४ दुकानांच्या ई-लिलावाची प्रक्रिया जसे की नोंदणी, अर्जविक्री आणि स्वीकृती नुकतीच मुंबई मंडळाने सुरू केली आहे. त्यानंतर आता मुंबईत १६ प्लॉटचा ई-लिलाव करण्याचा निर्णयही मंडळाकडून घेण्यात आला आहे. त्यासाठी जाहिरात काढण्याची तयारी देखील करण्यात आली आहे. पुढील १५ ही जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईतील म्हाडाच्या या प्लॉटची साईज किती आहे? आणि प्लॉटचे लोकेशन मुंबईत कुठे आहे? याची माहिती जाणून घेऊया..
म्हाडाच्या ताब्यात असलेल्या प्लॉट्सपैकी काही प्लॉट वेगवेगळ्या सुविधांसाठी राखून ठेवण्यात आले आहेत. आणि त्या उद्देशासाठीच त्यांचा वापर करणे बंधनकारक आहे. अशा प्लॉट्सना संबंधित मंडळाकडून ई-लिलावाच्या माध्यमातून सुमारे ८० ते ९० वर्षांच्या दीर्घ भाडेकरारावर देण्यात येते. मुंबई मंडळाने यापूर्वीही अशा प्रकारचे अनेक ई-लिलाव पूर्ण केले आहेत. २०२४ मध्ये १७ प्लॉट्सची प्रक्रिया सुरू झाली होती; मात्र दोन प्लॉट्स काही कारणाने वगळल्यानंतर अखेर १५ प्लॉट्सचा लिलाव करण्यात आला. या लिलावाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. यात १५ पैकी फक्त ५ प्लॉट्सवरच बोली लागली. तरी, या पाच प्लॉट्समधूनच मंडळाला तब्बल २०० कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
पाचही प्लॉट्सला अपेक्षेपेक्षा जास्त दर मिळाल्याने मंडळाचा महसूल लक्षणीय वाढला. आता मागील ई-लिलावात विक्री न झालेल्या १० प्लॉट्ससोबत आणखी ६ नवीन प्लॉट्स जोडून अशा एकूण १६ प्लॉट्सचा पुढील ई-लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी मिळावी म्हणून तो म्हाडाचे उपाध्यक्ष यांच्याकडे पाठवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, ई-लिलावाच्या जाहिरातीची तयारी आणि पुढील प्रक्रिया जलद गतीने सुरू आहे. उपाध्यक्षांची मंजुरी मिळताच जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून, त्यानंतर नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती आणि बोली प्रक्रियेचा औपचारिक प्रारंभ होईल. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात ही संपूर्ण प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
येथे वाचा – म्हाडाची जबरदस्त ऑफर! 5 वर्ष भाडं भरा आणि घर मिळवा..
मुंबईत येथे मिळणार म्हाडाचे प्लॉट (Mhada Plots)
मालवणी, कांदिवली, टागोरनगर (विक्रोळी), कन्नमवारनगर (विक्रोळी), जोगेश्वरी यांसह इतर काही भागातील प्लॉट्स (Mhada Plots) यावेळच्या ई-लिलावात समाविष्ट करण्यात येणार आहेत. म्हाडाचे हे प्लॉट्स शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि मनोरंजन अशा विविध उपयोगांसाठी हे प्लॉट्स राखीव असतील. सुमारे २,००० ते ५,००० चौ. मीटरपर्यंतच्या आकारातील प्लॉट्स या यादीत असण्याची शक्यता आहे. या प्लॉट्सची बोली किंमत लवकरच निश्चित केली जाईल आणि त्यानंतर लिलावातून मंडळाला किती महसूल मिळू शकतो याची स्पष्ट कल्पना येईल. यावेळी लिलावाला किती प्रतिसाद मिळतो आणि सर्व प्लॉट्स विक्रीस जातात का, याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.
येथे वाचा – म्हाडाची जबरदस्त ऑफर! 5 वर्ष भाडं भरा आणि घर मिळवा..
How to get flat